Wednesday, September 26, 2018

आयुष्यमान भारत योजना

आयुष्यमान भारत काय आहे योजना

जगातील सर्वात मोठी आरोग्यविमा योजना म्हणून लौकिक पावलेल्या आयुष्यमान भारत योजनेचा प्रारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केला. या योजनेंतर्गत देशातील दहा कोटी कुटुंबांना विमा कवच मिळणार आहे. 
पाच लाख रुपयांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचाराची सुविधा याअंतर्गत मिळणार आहे
दारिद्य्र रेषेखालील कुटुंबासह आर्थिक मागासांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. 
गरिबांना मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचा सरकारचा उद्देश आहे.

कोणत्या सुविधा

रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्यानंतरच खर्च, डिस्चार्ज मिळाल्यानंतर पुन्हा वैद्यकीय तपासणीस आल्यास मोफत उपचार, नवजात बालकांवर उपचारांसह अन्य सेवांचा लाभ मिळणार आहे. कर्करोग, हृदयरोग बायपास शस्त्रक्रिया, डोळे, दंत चिकित्सा आणि शस्त्रक्रिया, सिटी स्कॅन, एमआरआय आदी 13 हून अधिक आजारांवर या योजनेंतर्गत उपचार घेता येतील. या योजनेंतर्गत लाभ घेणार्‍यांना एक रुपयाही खर्च करावा लागणार नाही. रुग्णांना कॅशलेस आणि पेपरलेस सुविधा मिळेल.

कुणाला मिळणार लाभ

सामाजिक-आर्थिक जाती जनगणनेच्या आधारे लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये 10 कोटी गरीब कुटुंबातील व्यक्‍ती आणि गरजूंचा समावेश असणार आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील गरिबांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. लाभार्थ्यांची नोंद राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडे करण्यात येईल. 28 फेब्रुवारी 2018 पर्यंत मुदत असणार्‍या राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजनेच्या लाभार्थ्यांनाही या योजनेंतर्गत लाभ मिळणार आहे.

लाभार्थ्यांची निवड

या योजनेचा प्रारंभ करण्याआधीच लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात आली आहे. देशातील गोरगरिबांचा यामध्ये प्राधान्याने समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुणालाही स्वतःहून या यादीत नाव घालता येणार नाही. आर्थिक क्षमतांचा विचार करूनच 11 श्रेणीद्वारे लाभार्थ्यांची सरकारने निवड केली आहे. सामाजिक आर्थिक जनगणनेच्या आधारे लाभार्थ्यांची निवड केली असून यामध्ये नाव असल्यास संबंधितांच्या कुटुंबीयांना त्यांच्या कुटुंबातील आणखी सदस्यांची नोंदणी करता येईल.
ओळखपत्र क्रमांक मिळणार
लाभार्थी कुटुंबीयांना पंतप्रधान आरोग्य कुटुंब ओळखपत्र क्रमांक देण्यात येणार आहे. रुग्णालयात दाखल होताना हा क्रमांक दाखविणे अनिवार्य असेल. संबंधित रुग्णालयातील आयुष्यमान मित्र हेल्प डेस्कशी संपर्क साधून कागदपत्रे सादर केल्यास लाभ मिळणार आहे.

टोल फ्री क्रमांक

या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना काही अडचणी असल्यास 14555 या टोल फ्री क्रमांकाची सुविधा करण्यात आली आहे.

कुठे मिळणार लाभ

सरकारी आणि खासगी रुग्णालयात या योजनेअंर्गत रुग्णांना उपचाराची सुविधा मिळणार आहे. संबंधित रुग्णालयाची माहिती बेवसाईट, मोबाईल अ‍ॅप अथवा टोल फ्री नंबरवर मिळणार आहे. त्यामुळे रुग्णांना योग्य ठिकाणी उपचार घेता येतील.
जगात सर्वात मोठी योजना
जगात सध्या अस्तित्वात असलेल्या आरोग्य योजनेपेक्षा सर्वात मोठी आयुष्यमान आरोग्य योजना आहे.

No comments:

Post a Comment