Wednesday, September 26, 2018

आयुष्यमान भारत योजना

आयुष्यमान भारत काय आहे योजना

जगातील सर्वात मोठी आरोग्यविमा योजना म्हणून लौकिक पावलेल्या आयुष्यमान भारत योजनेचा प्रारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केला. या योजनेंतर्गत देशातील दहा कोटी कुटुंबांना विमा कवच मिळणार आहे. 
पाच लाख रुपयांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचाराची सुविधा याअंतर्गत मिळणार आहे
दारिद्य्र रेषेखालील कुटुंबासह आर्थिक मागासांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. 
गरिबांना मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचा सरकारचा उद्देश आहे.

कोणत्या सुविधा

रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्यानंतरच खर्च, डिस्चार्ज मिळाल्यानंतर पुन्हा वैद्यकीय तपासणीस आल्यास मोफत उपचार, नवजात बालकांवर उपचारांसह अन्य सेवांचा लाभ मिळणार आहे. कर्करोग, हृदयरोग बायपास शस्त्रक्रिया, डोळे, दंत चिकित्सा आणि शस्त्रक्रिया, सिटी स्कॅन, एमआरआय आदी 13 हून अधिक आजारांवर या योजनेंतर्गत उपचार घेता येतील. या योजनेंतर्गत लाभ घेणार्‍यांना एक रुपयाही खर्च करावा लागणार नाही. रुग्णांना कॅशलेस आणि पेपरलेस सुविधा मिळेल.

कुणाला मिळणार लाभ

सामाजिक-आर्थिक जाती जनगणनेच्या आधारे लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये 10 कोटी गरीब कुटुंबातील व्यक्‍ती आणि गरजूंचा समावेश असणार आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील गरिबांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. लाभार्थ्यांची नोंद राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडे करण्यात येईल. 28 फेब्रुवारी 2018 पर्यंत मुदत असणार्‍या राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजनेच्या लाभार्थ्यांनाही या योजनेंतर्गत लाभ मिळणार आहे.

लाभार्थ्यांची निवड

या योजनेचा प्रारंभ करण्याआधीच लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात आली आहे. देशातील गोरगरिबांचा यामध्ये प्राधान्याने समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुणालाही स्वतःहून या यादीत नाव घालता येणार नाही. आर्थिक क्षमतांचा विचार करूनच 11 श्रेणीद्वारे लाभार्थ्यांची सरकारने निवड केली आहे. सामाजिक आर्थिक जनगणनेच्या आधारे लाभार्थ्यांची निवड केली असून यामध्ये नाव असल्यास संबंधितांच्या कुटुंबीयांना त्यांच्या कुटुंबातील आणखी सदस्यांची नोंदणी करता येईल.
ओळखपत्र क्रमांक मिळणार
लाभार्थी कुटुंबीयांना पंतप्रधान आरोग्य कुटुंब ओळखपत्र क्रमांक देण्यात येणार आहे. रुग्णालयात दाखल होताना हा क्रमांक दाखविणे अनिवार्य असेल. संबंधित रुग्णालयातील आयुष्यमान मित्र हेल्प डेस्कशी संपर्क साधून कागदपत्रे सादर केल्यास लाभ मिळणार आहे.

टोल फ्री क्रमांक

या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना काही अडचणी असल्यास 14555 या टोल फ्री क्रमांकाची सुविधा करण्यात आली आहे.

कुठे मिळणार लाभ

सरकारी आणि खासगी रुग्णालयात या योजनेअंर्गत रुग्णांना उपचाराची सुविधा मिळणार आहे. संबंधित रुग्णालयाची माहिती बेवसाईट, मोबाईल अ‍ॅप अथवा टोल फ्री नंबरवर मिळणार आहे. त्यामुळे रुग्णांना योग्य ठिकाणी उपचार घेता येतील.
जगात सर्वात मोठी योजना
जगात सध्या अस्तित्वात असलेल्या आरोग्य योजनेपेक्षा सर्वात मोठी आयुष्यमान आरोग्य योजना आहे.

Friday, September 14, 2018

मुद्रा बँक योजना

मुद्रा बँक योजना






प्रस्तावना

देशातील लघु उद्योगांना सहज कर्ज पुरवठा व्हावा, या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ एप्रिल २०१५ रोजी  २०,००० करोड रुपये भांडवल असलेली ‘मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी’ अर्थात मुद्रा बँकेचे उद्घाटन केले.
या बँकेतून लघु उद्योजकांना 10 लाखांपर्यंतचं कर्ज सहज उपलब्ध होणार आहे. यासाठी सरकारने एकूण 20 हजार कोटींची तरतूद केली आहे. या बँकेच्या मध्यमातून लघु उद्योगांना कर्ज देण्यासाठी देशातील इतर बँकांना प्रोत्साहनही देण्यात येईल. शिवाय या कर्ज योजनांच्या नियमनाचं कामही मुद्रा बँकेच्या हाती असेल.

मुद्रा योजनेतील कर्जाचे प्रकार
मुद्रा योजनेत खालील तीन श्रेणीचा समावेश आहे:
शिशू : शिशू श्रेणीअंतर्गत 50,000 रुपयांचं कर्ज मिळू शकतं

किशोर : किशोर श्रेणीत 50,000 रुपयांपासून 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिलं जाते

तरुण श्रेणी : तरुण श्रेणीअंतर्गंत 5 लाख रुपयांपासून 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळेल

थोडक्यात मुद्रा बँक योजना
मुद्रा बँकेद्वारे छोट्या कारखानदारांना आणि दुकानदारांना कर्ज मिळेल. ज्यांना नवा उद्योग, काम सुरु करायचे असेल, त्यांनाही कर्ज मिळेल. त्याच बरोबर भाजीवाले, सलून, फेरीवाले, चहाचे दुकानदार यांनाही लोन दिले जाईल.
पंतप्रधान मुद्रा योजनेत प्रत्येक सेक्टर नुसार स्कीम बनवली जाते. प्रत्येक सेक्टर मध्ये वेगवेगळ्या स्कीम असतील. मुद्रा बँक हि रिझव्‍‌र्ह बँकेच्या नियंत्रणाखाली ती काम करते. मुद्रा ही संस्था मुख्यत: लघु उद्योगांनाच अर्थ पुरवठा करते. व्याजाचा दर कमी आहे.. कर्ज मंजूर झाले की त्यानंतर कर्जदाराला “मुद्रा कार्ड” दिले जाते जे की क्रेडीट कार्ड सारखे असेल आणि जेवढे कर्ज मंजूर झाले आहे तसे वापरता येईल.
मुद्रा योजनेची वैशिष्टय़े
देशातील ५.७७ कोटी उद्योजकांना वित्तसाहाय्य

वार्षिक ७ टक्के दराने १० लाख रुपयांपर्यंत अर्थपुरवठा

२०,००० कोटींचे भक्कम सरकारचे भांडवली पाठबळ

सिडबीची ही उपकंपनी रिझव्‍‌र्ह बँकेच्या अखत्यारीत येणार

सूक्ष्म वित्त संस्थेव्यतिरिक्त बँकेकरिता स्वतंत्र विधेयक

मुद्रा लोन साठी आवश्यक बाबी

कोणत्याही प्रकारचा जामीन नाही.

कोणत्याही प्रकारचे मोर्गेज ठेवावे नाही

स्वतःचे 10 टक्के भाग भांडवलची गरज नाही.

हि योजना फक्त सरकारी बँकेतच होणार.

वय 18 वर्षे पूर्ण असले पाहिजेत

अर्जदार कोणत्याही बँकेचा थकबाकीदार नसावा.

मुद्रा बँकेतून कर्ज घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे

ओळखीचा पुरावा – मतदान ओळख पत्र, आधार कार्ड इ.

रहिवासी पुरावा उदा – लाईट बिल, घर पावती.

आपण जो व्यवसाय करणार आहोत किंवा करत आहोत त्याचा परवाना व स्थायी पत्ता.

व्यवसायासाठी लागणारे मटेरियल किंवा यंत्र सामुग्री इ. त्याचे कोटेशन व बिले.

आपण ज्या व्यापाऱ्याकडून माल घेतला त्याचे पुर्ण नाव व पत्ता.

अर्जदाराचे 2 फोटो.



अधिक माहितीसाठी
http://www.mudra.org.in/
 या वेबलिंकवर क्लिक करा

For English click below link
http://sukanyasamrudhiyojana.blogspot.com/2016/02/pradhan-mantri-mudra-yojana.html?m=1